आष्टी (प्रतिनिधी): मतदार संघातील २१ महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे एक लाख एकरांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन पूर्णपणे वाहून गेली आहे त्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
माजी आमदार भिमराव ढोणे यांनी सांगितले की, मी माझी एक महिन्याची पेन्शन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करणार आहे.

आष्टी येथील भगवान महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे त्यांना हेक्टरी दोन लाख रुपये आणि विहीर बुजलेल्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.






