IPL 2026 RCB vs SRH चा थरार सुरू झाला असून पहिल्याच सामन्यात गतविजेत्या Royal Challengers Bengaluru (RCB) ने विजयाचा चौकार मारला आहे. विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर RCB ने Sunrisers Hyderabad (SRH) चा ६ गडी राखून पराभव केला.
विराट कोहलीचा ‘किंग’ अवतार
२०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. त्याने अवघ्या ३८ चेंडूत नाबाद ६९ धावा फटकावून आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे सामन्याचा शेवट त्याने हर्षल पटेलला ६, ४, ४, ४ अशा बाउंड्री मारून केला. त्याला देवदत्त पडिक्कल (६१ धावा) आणि कर्णधार रजत पाटीदार (३१ धावा) यांनी मोलाची साथ दिली.
सामन्याचे महत्त्वाचे हायलाइट्स (RCB vs SRH Highlights):
- नाणेफेक: आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- SRH ची फलंदाजी: इशान किशनच्या ८० (३८ चेंडू) आणि अनिकेत वर्माच्या ४३ (१८ चेंडू) धावांच्या जोरावर हैदराबादने २०१/९ अशी मोठी धावसंख्या उभारली.
- डेब्युटंटची कमाल: आरसीबीसाठी पहिलाच सामना खेळणाऱ्या जेकब डफीने (Jacob Duffy) ३/२२ अशी घातक गोलंदाजी करत हैदराबादची दाणादाण उडवली.
- आरसीबीचा विजय: आरसीबीने १५.४ षटकांतच २०२ धावांचे लक्ष्य गाठले.
RCB vs SRH दोन नवीन चेहरे आणि इम्पॅक्ट प्लेयर्स
आरसीबीने या सामन्यात जेकब डफी आणि अभिनंदन सिंग या दोन नवीन खेळाडूंना संधी दिली. तसेच, जेकब बेथेल आणि देवदत्त पडिक्कल यांना सुरुवातीला प्लेइंग XI मध्ये स्थान मिळाले नव्हते, मात्र पडिक्कलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून येत तुफानी फटकेबाजी केली.
“आम्ही फक्त ट्रॉफी डिफेंड करायला आलो नाही, तर पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. जर्सीवर दुसरा ‘स्टार’ लावण्याचे आमचे स्वप्न आहे.” – रजत पाटीदार (कर्णधार, RCB)
IPL 2026 Points Table मध्ये RCB अव्वल
या मोठ्या विजयामुळे आरसीबीने नेट रनरेटमध्ये मोठी झेप घेत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, कारण आरसीबीने त्यांच्या चॅम्पियन स्टाईलमध्ये हंगामाची सुरुवात केली आहे.
Read More : RCB vs SRH Live Score, IPL 2026: जॅकब डफीचे वादळ! पदार्पणातच SRH ची दाणादाण, पॉवरप्लेमध्येच चटकावले 3 बळी






