• Home
  • आजच्या बातम्या
  • एका रात्रीत 8 दुकाने फोडणारी चोरीची टोळी 12 तासांत जेरबंद; 1.15 लाखांचा मुद्देमाल जप्त
Image

एका रात्रीत 8 दुकाने फोडणारी चोरीची टोळी 12 तासांत जेरबंद; 1.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका रात्रीत तब्बल 8 दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीला अवघ्या 12 तासांच्या आत मिरजगाव पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 5 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत मिरजगाव ते कडा रोडवरील वीर पाटील कॉम्प्लेक्स मधील 8 दुकानांच्या मागील बाजूचा पत्रा उचकावून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. आरोपींनी सोलर किटचे 13 कंट्रोलर, सीसीटीव्ही कॅमेराचा DVR, ड्रिल मशीन, स्पॅनर सेट, ट्रॅक्टर टेप, स्पीकर वायर, कटर तसेच रोख रक्कम असा विविध प्रकारचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी अभय बाळासाहेब दळवी (रा. तिखी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 74/2026 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद बीएनएस कलम 331(4), 334(1), 305, 324(4), 3(5) अन्वये करण्यात आली आहे.

एका रात्रीत सलग 8 दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मिरजगाव पोलिसांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड आणि तपास पथकाने तपास सुरू केला.

दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मनोहर भीमराव पवार (रा. बीडसांगवी, ता. आष्टी, जि. बीड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी त्याचे साथीदार

  • अरुण रघुनाथ बर्डे
  • काळुराम चंदू माळी
  • ज्ञानेश्वर गंगाराम साळुंखे
  • सुरेश बाळू माळी
  • भास्कर बबन गांगर्डे

(सर्व रा. देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांना अटक केली.

तपासादरम्यान आरोपींकडून एकूण 1,15,000 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी मनोहर पवार याच्यावर यापूर्वीही आष्टी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा (क्र.118/2015) दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह पोलीस पथकातील शंकर रोकडे, गणेश ठोंबरे, सुनिल खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे, अक्षय गार्डे, बळीराम काकडे तसेच होमगार्ड प्रशांत माने, अजय फुलमाळी, अक्षय पवार, दिपक काळे, बिभीषण रणदिवे यांनी सहभाग घेतला.सदर गुन्ह्याचा पुढील तपास शंकर रोकडे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Releated Posts

संतोष देशमुख प्रकरण: मुख्य आरोपी वाल्मिक कराडची तुरुंगात प्रकृती खालावली; न्यायालयीन लढाईवर काय परिणाम?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात गेले काही महिने चर्चेत असलेल्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता एक नवीन आणि धक्कादायक…

ByByAkash pawar May 20, 2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा पेच सुटला: बहुप्रतीक्षित महामंडळ वाटपाचा मार्ग मोकळा!

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला आणि सत्तेतील घटक पक्षांमध्ये (भाजप, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट…

ByByAkash pawar May 20, 2026

भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका: नागरिक सुरक्षित की भीतीच्या छायेत? – मनेका गांधींच्या भूमिकेचे विश्लेषण

आजकाल आपल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा सकाळी किंवा संध्याकाळी…

ByByAkash pawar May 20, 2026

उल्हासनगर हादरले! तरुणीच्या गंभीर आरोपांनी पोलीस दलात खळबळ: न्याय मिळणार का?

”’उल्हासनगर हादरले! तरुणीच्या गंभीर आरोपांनी पोलीस दलात खळबळ: न्याय मिळणार का?”’ उल्हासनगर शहरातील वातावरण सध्या एका गंभीर प्रकरणामुळे…

ByByAkash pawar May 20, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top