• Home
  • आजच्या बातम्या
  • बीड जिल्ह्यात खळबळ! विवाहित तरुणीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीला अटक
Image

बीड जिल्ह्यात खळबळ! विवाहित तरुणीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीला अटक

बीड : जिल्ह्यातील हिवरा पहाडी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातीलच एका विवाहित तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच वैभव पटेकर या तरुणाने रात्रीच्या सुमारास संबंधित विवाहित तरुणीला जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतक्यावरच न थांबता पहाटेच्या सुमारास आरोपीने पीडितेला गावातील चावडीला बांधून ठेवले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सकाळी गावातील नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली..

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाणे येथे आरोपी वैभव पटेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Releated Posts

युझवेंद्र चहलचा फिटनेस मंत्र: दीर्घकाळ टिकणाऱ्या करिअरचे रहस्य!

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा केवळ त्याच्या फिरकीच्या जादूसाठीच नव्हे, तर त्याच्या मैदानाबाहेरील भूमिका आणि विचारसरणीसाठीही…

ByByAkash pawar Apr 11, 2026

पुणे मेट्रोचा मास्टरस्ट्रोक: हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर 3 वरून थेट 6 डब्यांची क्षमता वाढ, जाणून घ्या फायदे!

पुणे शहर, जे वेगाने एक जागतिक दर्जाचं महानगर बनत आहे, तेथे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले…

ByByAkash pawar Apr 11, 2026

छगन भुजबळांचा अपघात टळला, पण शासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह!

आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली, ती म्हणजे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न…

ByByAkash pawar Apr 11, 2026

रामायण चित्रपटाची जोरदार चर्चा: रणबीर, साई पल्लवी आणि यशच्या एंट्रीने उत्सुकता शिगेला!

बॉलिवूडमध्ये सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे, तो म्हणजे ‘रामायण’. नितेश तिवारी दिग्दर्शित हा भव्य चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर…

ByByAkash pawar Apr 11, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

<label for="comment">Comment's</label>

Scroll to Top